लग्नानंतर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोज समोर येत असतात मात्र पुणे इथे यापेक्षा वेगळीच अशी घटना समोर आलेली असून एका महिलेने लग्नानंतर आपल्या नवऱ्याला त्रास देऊन त्याची समाजात बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नपुंसक असल्याचा आरोप करत ही महिला त्याचा छळ करत होती. संतप्त नवऱ्याने देखील तिच्या चांगल्याच उखाळ्या पाखाळ्या काढत पोलिसात धाव घेतली.सदर घटना जानेवारी 2019 ते 23 जानेवारी 2021 दरम्यान घडली आहे. 30 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून तपास सुरु आहे.
नवऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर बायको काही ना काही कारणावरुन त्याच्यासोबत भांडण करीत होती. त्याला शिवीगाळदेखील करायची. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याला धमकी देऊ लागली. महिला माझा नवरा नपुंसक असल्याचे खोेटे आरोप सार्वजनिकपणे करीत असल्याने तरुणाला समाजात अनेक ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागला मात्र अखेर त्याने पोलीस ठाण्यात बायकोविरोधात तक्रार केली.
तक्रारीत म्हटले आहे की, 23 जानेवारी रोजी पत्नी घरात घुसली आणि कपाटात आईचे तब्बल 8 ते 9 तोळे दागिने, 25 तोळे चांदीची पट्टी असं बरसचं सामान घेऊन निघून गेली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी या प्रकरणाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.