बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका बंटी बबलीने बचत गटाच्या नावाखाली गोरगरीब महिलांकडून कागदपत्रे घेतली आणि त्यावर विविध बॅंकांकडून तब्बल 36 लाखाचे कर्ज उचलले अन चर्चा सुरू झाल्यानंतर एकाच रात्रीत घर आणि जमीन विकून पलायन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तब्बल सात महिन्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विमलाबाई बंडू रोकडे ( राहणार संजय नगर गेवराई ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकीला अब्बास सय्यद, अब्बास सय्यद, आवेज अब्बास सय्यद ( सर्वजण राहणार संजय नगर बीड ) अशी आरोपींची नावे आहेत.
शकीला आणि अब्बास यांनी त्यांचा मुलगा आवेज यालाही हाताशी घेत विमलाबाई यांच्यासारख्या 17 महिलांकडून लघुउद्योगासाठी कर्ज मंजूर करून देतो म्हणून कागदपत्रे घेतली होती तसेच त्यासोबत त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील घेण्यात आल्या होत्या मात्र परस्पर त्यांनी एसबीआय , अन्नपूर्णा, बंधन, यशोदा बँक यासारख्या बँकांकडून कर्ज घेतली आणि पलायन केले. कर्ज थकल्यानंतर बँकांनी विचारणा केली असता हे पैसे आम्हाला आलेच नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.