पुण्यात खळबळ..’ डायना भेटली आता कीर्ती नको ‘ , जोडपं नागपूरमध्ये धरलं

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुणे येथे समोर आलेली असून काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे लिव्ह इन पार्टनरची हत्या करून फरार झालेल्या एका व्यक्तीला नागपूर येथे सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकलेल्या आहे. पोलीस तपासात नवीन प्रेयसी मिळाली म्हणून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी तरुणी आपल्या आता काय उपयोगाची म्हणून त्याने नवीन प्रेयसीला सोबत घेत या तरुणीचा खून केला होता.

उपलब्ध माहितीनुसार, आशिष भोसले ( वय 20 ) असे या तरुणाचे नाव असून दीड वर्षापूर्वी सातारा येथील कीर्ती नावाच्या एका तरुणीशी त्याची मैत्री झाली होती. कीर्ती हिला आशिष याने एका कपड्याच्या शोरूममध्ये नोकरी देखील लावून दिली मात्र त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले आणि या प्रेम संबंधाला तिच्या घरच्यांचा विरोध होता त्यानंतर त्यांनी रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि वाकड येथे एक खोली घेऊन ते पती-पत्नी सारखे राहू लागले.

दरम्यानच्या काळात आशिष काम करत असलेल्या एका ठिकाणी डायना नावाची एक तरुणी नोकरीसाठी आली आणि काही कालावधीतच आशिष आणि तिच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. एकीकडे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी कीर्ती तर दुसरीकडे नवीनच तयार झालेली प्रेयसी डायना यामुळे आशिष आणि किर्ती यांच्यात वाद सुरू झाले त्यामुळे आशिषने 19 जुलै रोजी तिची हत्या केली आणि त्यानंतर कीर्तीने आत्महत्या केली असा बनाव रचत दोघांनीही मुंबई येथे पलायन केले होते.

कीर्ती हिच्या भावाने या प्रकरणी पोलिसात दाखल होत आशिष याच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलीस तपासात डायना ही देखील बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यावर पोलिस त्यांचा शोध घेत होते याच दरम्यान ती नागपूर येथे असल्याची माहिती हाती आली. मोबाईल टावरच्या आधारे एका पेट्रोल पंपावर त्यांचे लोकेशन समजताच पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली. पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, अमोल कचोरे यांच्या पथकाने त्यांना तात्काळ बेड्या ठोकल्या. वाकड पोलीस नागपूर येथे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना पुणे पोलिसांच्या हवाली करण्यात आले .


Spread the love