दुचाकी गाड्यांची सध्या तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे मात्र गाडी घेण्यापूर्वी अनेक जण गाडीची ट्रायल म्हणून एक चक्कर मारून येतात मात्र एका वाहन विक्रेत्याला हा प्रकार चांगलाच भारी पडलेला असून ट्रायल म्हणून दिलेले वाहन परस्पर गायब करण्यात आलेले आहे . ‘ अशीच बाईक मला देखील घ्यायची आहे ‘, असे सांगत मुंबई येथील एका दुकानात तो आलेला होता त्यानंतर त्याने ट्रायल म्हणून घेतलेली बाईक घेऊन पलायन केले आणि पोलिसांनी काही तासात त्याला बेड्या ठोकल्या.
सदर तरुण हा मूळचा हैदराबाद येथील असून चारकोप पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत अनेक मोटरसायकल पळवल्याचा आरोप असून त्याच्याकडून इतरही अनेक गाड्या अशा तब्बल पंधरा लाखांच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. जुबेर इरफान सय्यद ( वय 26 ) असे त्याचे नाव असून मे महिन्यात चारकोप येथील एका रहिवाशांची ट्रम्प गाडी घेऊन तो फरार झाला होता
पोलिसात प्रकरण दाखल झाल्यानंतर चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या सूचनेवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याची ओळख पटवली आणि अवघ्या काही तासात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याने बाईक चोरणे हेच आपले मुख्य उद्देश होते . चोरीच्या बाईक सहजासहजी विकल्या जातात त्यामुळे आपण हा प्रकार केला असे तो म्हणाला.