मुंबईत एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी एक तरुणी बाहेर गेली होती त्याचा फायदा घेत तिच्या कपाटातील अकरा लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे मात्र ओशिवरा पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकलेल्या असून प्रितेश मांजरेकर, रोहित कोरडे आणि रोहित हेगडे यांच्याकडून सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या पूजा विश्वास ( वय 24 ) या 17 जुलै रोजी मित्रांसोबत खार इथे जेवण करण्यासाठी गेल्या होत्या मात्र घरी परतल्या त्यावेळी घराचे दार त्यांना उघडे दिसले आणि सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर जवळपास 11 लाख 12 हजार रुपयांचे सोने देखील चोरांनी लंपास केले होते त्यानंतर पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी त्यांनी तक्रार नोंद नोंदवली.
तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या मदतीने पोलिसांनी माहिती काढली असता संशयित आरोपींची नावे आणि फोटो आणि पत्ता देखील मिळाला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून चोरी केलेला 100% माल हस्तगत केला. सदर कारवाईबद्दल पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे .