मंदिरात दर्शनाला गेलेल्या व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला अन ..

Spread the love

एक संतापजनक घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे समोर आलेली असून ‘ मुलगी नको ‘ या भावनेने एक आईने भर पावसात तिला घाटनदेवी मंदिर परिसरात सोडून पलायन केले आहे. गुरुवारी ही घटना उघडकीला आली असून संध्याकाळी चारच्या सुमारास ही मुलगी भरपावसात रडत होती त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

उपलब्ध माहितीनुसार, संध्याकाळी साडेआठच्या सुमारास परिसरातील रहिवासी असलेले जितेश महेश चारमिया हे दर्शनासाठी गेलेले असताना तिथे त्यांना एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्यानंतर त्यांनी मुलीला पावसातून सर्वप्रथम आडोशाला आणले आणि या प्रकाराची पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसरात चौकशी केली मात्र कोणीही या मुलीच्या पालकत्वासाठी पुढे आले नाही. वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आले असून मुलीची प्रकृती व्यवस्थित असून या फरार मातेचा शोध पोलीस घेत आहेत.


Spread the love