पुणे ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ मृतदेहाची ओळख पडली

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून धायरी परिसरात रहिवासी असलेले भानुदास लाळे ( वय 72 ) या वृद्ध व्यक्तीने एका कॅनॉलमध्ये उडी घेत आत्महत्या केलेली आहे. ते 22 जुलैपासून ते घरातून गायब होते. त्यांच्या मुलाचा सिंहगड परिसरात हॉटेल व्यवसाय आहे. घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून प्राथमिक दृष्ट्या घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील धायरी फाटा जवळील सणस शाळेजवळ असलेल्या एका कॅनॉलमध्ये मधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळून आला होता. त्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशामक दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यांची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून सिंहगड पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love