महाराष्ट्र हादरला.. अखेर ‘ त्या ‘ मृतदेहाचे रहस्य उलगडले , सिकंदर अन..

Spread the love

महाराष्ट्रात विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येत असतात त्यातून बऱ्याचदा खुनापर्यंत देखील काही प्रकरणे गेलेली आहे असेच एक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घराजवळ राहणाऱ्या एका अविवाहित तरुणाने शेजारी राहणाऱ्या विवाहितेससोबत प्रेमसंबंध केले आणि त्यानंतर ते दोघेही पळून जाऊन एकत्रित राहायला लागले. सदर महिलेच्या पतीने संतप्त होत या युवकाचे घर गाठले आणि त्याच्या वडिलांची हत्या केली वडिलांची हत्या केल्यावर तरी तो येईल आणि त्याला संपवू असा या पतीचा प्रयत्न होता मात्र त्याच्या आत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, कोराडी नाल्याजवळ 21 जुलै रोजी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर जखम होती पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली त्यावेळी हा मृतदेह रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील ( वय 50 राहणार आंबेडकर वार्ड माजरी ) यांचा असल्याचे समजले. त्यांचा मुलगा सिकंदर याने हा मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे सांगितले.

सिकंदर पाटील याच्या शेजारी राहणारा पिंटू पेटकर या व्यक्तीच्या पत्नीसोबत सिकंदर याचे प्रेमसंबंध होते. पिंटू याचा या प्रकरणाला विरोध असल्याने पत्नीने अखेर पिंटू याला चकवा देत सिकंदर यांच्यासोबत पलायन केले होते आणि दुसर्‍या गावात जाऊन त्यांनी संसार थाटला होता. आपली पत्नी पळून गेल्यानंतर पिंटू याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आणि त्याने सिकंदर याच्या घरासमोर जाऊन कायमच शिव्या देण्यास सुरुवात केली .

घटना घडली त्या दिवशी मयत रामभाऊ पाटील अर्थात सिकंदर याचे वडील हे पुराचे पाणी आणि घरात शिरल्यामुळे महावीर शाळेत थांबलेले होते त्यावेळी पिंटू पेटकर तिथे आला आणि त्यांना एका चार चाकी गाडीत बसवून कोराडी नाल्याजवळ नेऊन त्याने त्यांचा खून केला. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सिकंदर येईल आणि त्याला देखील आपण संपवू असा त्याचा मनसुबा होता मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहे. सदर प्रकरणी पिंटू पेटकर याला एका व्यक्तीने मदत केली असून तो अद्याप फरार आहे .


Spread the love