एक अत्यंत खळबळजनक घटना पुणे येथे उघडकीला आलेली असून तब्बल 35 वर्ष वय असलेल्या एका व्यक्तीसोबत लग्न करण्यास बारा वर्षीय मुलीने नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिला गळफास घेऊन जीवे मारण्यात आले आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली असा बनाव रचण्यात आला. 31 मे रोजी घडलेला हा प्रकार असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडित मुलीच्या वडिलांनी आम्हाला तिचे लग्न लावून द्यायचं नव्हतं, ती फक्त सहावीत शिकत होती मात्र नात्यातील एक व्यक्ती आमच्यावर सातत्याने तिच्यासोबत लग्न लावून द्या म्हणून दबाव टाकत होता. पैशाच्या जोरावर आमच्यावर जबरदस्ती केली जात होती. पंकज काळे ( वय 35 ) असं मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत मयूर काळे, अजय काळे, हरी काळे हे देखील त्याला मदत करत होते.
सदर प्रकरणाबद्दल अधिक बोलताना मुलीच्या आईने सांगितले आहे की मुलीचे वडील घरी नसताना आरोपी घरात घुसले त्यांनी तिचा जीव घेतला आणि ते पसार झाले. गरीब कुटुंबातील आम्ही असल्यामुळे कोणी आमची तक्रार ऐकून घेतली नाही असे दुःख त्यांनी व्यक्त केलेले आहे. मुलीच्या मामाने देखील बहिणीवर आणि तिच्या पतीवर पंकज याच्यासोबत लग्न लावून देण्यासाठी दबाव टाकला जात होता असे म्हटले आहे. एपीआय विक्रम साळुंखे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून मुलीच्या पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर तिच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल असे म्हटले आहे. सदर घटनेबद्दल सर्वप्रथम वृत्त पुणेकर न्यूज यांनी वृत्त दिले होते.