अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तीन जणांना अटक , एक महिलाही सामील

Spread the love

एक खळबळजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात उघडकीला आली असून एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कागल पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी यांच्यासोबत एका महिलेला देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण शिवाजी कुरणे ( वय 35 राहणार कागल ) आणि संगीता रंगराव आकुर्डे ( वय 35 राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल ) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य आरोपीसह या दोघांनाही न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून 15 जुलै रोजी कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोन वर्षांपासून आरोपीने खोटी कारणे सांगत पीडितेला घरी नेऊन तसेच कागल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Spread the love