एक अत्यंत संतापजनक प्रकार मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या गोरेगाव येथे उघडकीला आलेला असून एका 13 वर्षीय मुलावर गेल्या पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत त्याचा व्हिडिओ बनवत तो व्हायरल करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकारात पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पोलिसांशी संपर्क केला त्यावेळी मुलाच्या काकाला व्हाट्सअपवर एक व्हिडिओ आढळून आला होता त्यामध्ये एका मुलासोबत हा प्रकार करत असताना इतर मुले हसत होती. पीडित मुलाला काकांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर या मुलाने आपल्यासोबत मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत असे प्रकार या मुलांनी केलेले आहेत असे सांगितल्याने मुलाच्या नातेवाइकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपी मुलांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्यामध्ये आरोपी मुलाच्या घराचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. आरोपी मुले ही लहान असली तरी केवळ मज्जा म्हणून ते या प्रकरणाचे गांभीर्य समजून न घेता हे व्हिडिओ सोशल मीडिया आणि व्हाट्सअपवर व्हायरल करत होते असे सांगण्यात आलेले आहे. केवळ गुन्हेगारी कृत्य न करता त्याचे चित्रीकरण देखील ते करताना दिसत असल्याने हा प्रकार जास्त संतापजनक आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.