पुणे हादरलं..तू आम्हाला आवडते म्हणाले अन बादली भरून आणली मात्र..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुण्याजवळ पिंपरी येथे उघडकीस आली असून आपल्या सोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना विरोध केला म्हणून तरुणीच्या अंगावर मिरची पावडरचे पाणी ओतण्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर घटना चिखली येथे 29 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा भाऊ मोरे ( वय 27 राहणार जाधववाडी चिखली ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत कुणाल भंडारी या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आणि तरुणी यांची एकमेकांशी तोंडओळख असून गेल्या काही महिन्यांपासून ते तिचा पाठलाग करत होते. तू आम्हाला आवडतेस असे कृष्णा मोरे तिला म्हणाला आणि पुन्हा भंडारी त्याने तिला जवळ ओढून तिच्या सोबत गैरवर्तन केले.

आपल्यासोबत घडलेल्या या विचित्र प्रकारानंतर तरुणीने त्यांना विरोध केला असता भंडारी याने तिच्या अंगावर मिरची मिक्स केलेले पाणी ओतले आणि आमच्या विरोधात जर तू पोलिसात तक्रार केलीस तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे देखील शब्द त्यांनी वापरले आणि तिचा विनयभंग केला असे तक्रारीत म्हटले आहे.


Spread the love