नाशिक हादरलं..विवाहबाह्य त्याच मात्र त्रास बायकोला मात्र अखेर…

Spread the love

स्वतःचे विवाहबाह्य संबंध असताना दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत तिचा मानसिक छळ केल्यानंतर सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा संतापजनक प्रकार नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात घडलेला आहे. सदर प्रकरणी तरुण वासुदेव कारडा ( वय 35 राहणार पखाल रोड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पखाल रोड परिसरात अशोका रॉयल येथे राहणाऱ्या पस्तीस वर्षीय विवाहिता यांनी राहत्या घरात 29 तारखेला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या बहिणीने या प्रकरणात त्यांचा पती याचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून तो सातत्याने तिला पैशासाठी त्रास देत असायचा असे सांगितल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


Spread the love