पुण्याच्या एसटी चालकाने बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीने घेतला गळफास

Spread the love

एक खळबळजनक घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून एका एसटी चालकाने चक्क बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धुळे येथे ही घटना समोर आलेली असून एसटी बसस्थानकाच्या आतच हा प्रकार घडलेला आहे . आत्महत्या केलेली व्यक्ती ही एसटीचे चालक होती असेही समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, धुळे बसस्थानक येथे हा प्रकार घडलेला असून हिरामण देवरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानक येथे हिरामण देवरे हे कार्यरत होते. पुणे- धुळे एसटी बस घेऊन ते धुळे बस स्थानक येथे आले होते त्यानंतर त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याची दोरी घेतली आणि बस मधेच स्वतःला फास लावून घेतला.

एसटी बसमध्ये असा प्रकार समोर आल्यानंतर सदर बातमी पोलिसांना देण्यात आली आणि तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची तात्काळ ओळख पटवण्यात आली असून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही.


Spread the love