गोव्याच्या गाडीत बसून फरार होण्याच्या तयारीत होते , इतक्यात पोलीस आले अन..

Spread the love

एक वेगळीच घटना कोल्हापूर येथे समोर आली असून मार्केट यार्डमधील एका दुकानातील दिवाणजी यांची नजर चुकवून चक्क ड्रावरमधील एक लाख 39 हजार रुपये हातोहात लंपास करून फरार झालेल्या एका बंटी-बबली दांपत्यास शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक दीपक महाडिक ( वय 24 ) आणि त्याची बायको नीता अभिषेक महाडिक उर्फ बन्नी शेख ( वय 22 ) अशी त्यांची नावे आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मार्केट यार्डमधील धनश्री ट्रेडर्स नावाच्या दुकानात रवींद्र पंडित सनगर हे व्यक्ती दिवानजी म्हणून काम करतात. 30 जून रोजी दुपारी एक महिला पैशाची गरज असल्याचे सांगून मोबाईल विक्रीसाठी आलेली होती. दिवाणजी यांनी तिचा मोबाईल पाहिल्यावर हा मोबाईल नादुरुस्त आहे तो विकत घेता येणार नाही असे सांगितले त्यानंतर या महिलेने पुढे दुकानाबाहेर माझे पती उभे आहे त्यांच्याशी बोला असे म्हणून दिवाणजी यांना तिकडे जाण्यास प्रवृत्त केले याच वेळी या महिलेने ड्रायव्हरमधील एक लाख 39 हजार रुपये घेऊन पलायन केले.

दिवानजी पुन्हा दुकानात आले त्यावेळी ड्रावर उघडला असताना त्यातील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली अन पोलिसात तपासात हे दांपत्य राजेंद्र नगर येथे भाड्याने राहत होते असे समोर आले. गुन्हा घडल्यानंतर ते गोवा येथे पसार झाल्याचे समजले होते मात्र पोलिसांनी तात्काळ पावले उचलत त्यांना गोवा येथे जाणाऱ्या एका गाडीत पकडले आणि पुन्हा कोल्हापूर येथे त्यांना आणण्यात आले आहे .


Spread the love