एक वेगळेच प्रकरण सध्या देशात चर्चेत आलेले असून 67 वर्षे व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर 19 वर्षीय तरुणीने त्याच्यासोबत लग्न करून संसार थाटलेला आहे. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही कुटुंबाकडून मोठा विरोध होता मात्र तरुणीने आमच्या जीवाला धोका आहे असे सांगत विवाह केला आणि त्यानंतर आमच्या जीविताला धोका आहे असे सांगत पोलिसांकडून संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे.
सदर जोडपे हे जेव्हा कोर्टात आले तेव्हा न्यायाधीश यांचा देखील ते पती-पत्नी आहेत यावर विश्वास बसला नाही. 19 वर्षीय तरुणी ही शेतकरी असलेल्या एका 67 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती. मुलीच्या घरच्यांनी आणि शेतकऱ्याच्या घरच्यांनी त्यांच्या या लग्नाला विरोध केला मात्र त्यांनी या विरोधाला न जुमानता लग्न केलेले आहे. शेतकरी हा रोज शेतीची कामे करून दरमहा सुमारे 15 हजार रुपये कमावतो, असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे.
तरुणीच्या म्हणण्यानुसार आपले कुटुंब मोठे असून त्यांची मोठ्या मोठ्या लोकांशी ओळख आहे त्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे. न्यायालयाने आम्हाला आमच्या संरक्षणासाठी आदेश जारी करावा असे म्हटले आहे. न्यायाधीशांनी देखील त्यांचा अर्ज दाखल करून घेतलेला असून 19 वर्षांची तरुणी 67 वर्षांच्या व्यक्तीशी कसे काय लग्न करू शकते हे यामध्ये स्पष्ट दिसत नाही असे म्हटले आहे. कदाचित लग्न करण्यासाठी त्या मुलीवर दबाव असू शकतो असेही न्यायालयाने सांगत 67 वर्षीय या व्यक्तीची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. सदर महिलेला एका महिला पोलीस टीमने सध्या संरक्षण दिले असून प्रकरण सध्या कोर्टात आहे.