देशात एक खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून सातत्याने ड्रग्सची नशा करत असलेल्या एका कंटाळलेल्या आईने अखेर तिच्या मुलीचा खून केलेला आहे. गाझियाबाद येथील ही घटना असून मुलीची हत्या केल्यानंतर या आईने पोलिसांना स्वतः फोन करून आपण आपल्या मुलीचा खून केलेला आहे असे सांगितले आणि त्यानंतर तिथून पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेसाठी पाठवून दिलेला आहे. टिळामोड पोलिसांनी आईच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून नफिसा असे आईचे नाव असून अमरीन असे मुलीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमरीन ही 19 वर्षीय तरुणी असून ती ड्रग्जच्या आहारी गेली होती त्यामुळे तिची आई तिच्यावर खूप नाराज होती. नशेच्या आहारी गेल्याने अमरीन ही सतत घरातून पळून जात असायची म्हणून तिची आईदेखील तिला वैतागलेली होती. संतापाच्या भरात या आईने तिच्यासोबत मारामारी करत उशीने तिचा गळा आवळला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेने मोबाईलवरून पोलिसांना ही माहिती समजून सांगितली आणि त्यानंतर ती फरार झाली.
महिलेच्या पतीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असून परिसरातील नागरिकांची लहान-मोठी कामे करत कशीबशी ती संसाराची गुजराण करत होती. वडिलांच्या मृत्यूचा या तरुणीला मोठा धक्का बसला आणि तिने नशा करण्यास सुरुवात केली. तिची हत्या करण्यापूर्वी आई नफिसा हिने तिच्या दोन मुलांना बटाटे आणण्यासाठी बाजारात पाठवले होते आणि त्यानंतर तिने तिच्या मुलीची हत्या केली.