भिंगरीचे आमिष दाखवत मंदिरामागे नेले अन.., अखेर कोर्टाचा निर्णय आला

Spread the love

एक खळबळजनक घटना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात उघडकीला आली होती. अवघ्या चार वर्षांच्या मुलाला भिंगरीचे आमिष दाखवत घरापासून दूर नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या दोन नराधमांना न्यायालयाने वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच दंडही ठोठावला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहुल राजाभाऊ पिस्तूलकर आणि आदित्य मनोहर येवले ( दोघेही राहणार पुलगाव ) अशी आरोपींची नावे असून 22 एप्रिल 2019 रोजी आरोपी राहुल हा मुलाच्या घरी गेलेला होता त्यावेळी त्याने त्याला भिंगरी घेऊन देण्याचे आमिष देत आपल्यासोबत घेतले आणि परिसरातील एका मंदिरामागे नेले तिथे दुसरा आरोपी आदित्य हा देखील उपस्थित होता आणि या दोघांनी पीडीत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घाबरलेल्या मुलाने तात्काळ घरी येऊन रडत रडत आईला ही माहिती सांगितली आणि आईने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी आई पोहोचली त्यावेळी तिथे कोणीही आढळून आले नाही. शेजारी राहणाऱ्या मुलांना ही माहिती समजताच मैदानावर जाऊन पाहिल्यावर मुलाने आरोपीकडे बोट दाखवले यावेळी उपस्थित युवकांनी त्यांची चांगलीच धुलाई करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. न्यायालयाने सदर प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पॉक्सो कायद्याअंतर्गत सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


Spread the love