महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला महिलेच्या दुसऱ्या पतीने तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून कुणाला काही सांगू नकोस असे धमकावण्याचे प्रकरण समोर आले आहे. बार्शी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 15 ऑगस्ट रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली असून महिलेचा दुसरा पती परमेश्वर गरदडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत प्रेमविवाह झालेला होता. अडीच वर्षे त्याच्यासोबत संसार केल्यानंतर या मुलीचा जन्म झाला त्यानंतर ही मुलगी तीन महिन्यांची असताना पहिल्या पतीने मुलीला आणि पत्नीला बार्शी येथे भाडेतत्त्वावर एक खोली घेऊन त्यामध्ये आणून ठेवले आणि त्यानंतर तो फरार झाला.
आपला पति आज परत येईल उद्या परत येईल या आशेने तब्बल अकरा वर्ष मुलीच्या आईने आणि मुलीने त्याची वाट पाहिली मात्र तो परत आला नाही. दरम्यानच्या काळात सदर महिलेची परमेश्वर गरदडे या व्यक्तीसोबत ओळख झाली आणि त्याने पंचांग पाहून तुझ्या पतीला परत घेऊन येऊ शकतो, असे म्हणत तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले. मुलीच्या आईला त्याने घरातच मंगळसूत्र बांधले आणि त्यानंतर अकरा वर्षे ते एकत्रित राहिले.
मागील एक वर्षांपासून परमेश्वर गरडे यांची नियत फिरली आणि तो पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला लज्जास्पद वर्तन करून त्रास देऊ लागला. सदर प्रकार मुलीने आईला सांगितला त्यानंतर आईने पोलिसात धाव घेत झाला प्रकार कथन केलेला असून त्यानुसार महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका गटकुळ या पुढील तपास करत आहेत.