स्वातंत्र्यदिन शेतकऱ्याने नाही पाहिला , त्यापूर्वीच १४ ऑगस्टला बाहेर पडले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली असून मोहोळजवळ असलेल्या अंकोली इथे एका 37 वर्षीय शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या पाईपने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेमागील कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून पोलिसांनी मोहोळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, स्वप्निल अशोक डोके ( वय 37 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते त्यांच्या कुटुंबासोबत मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे राहतात. 14 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता जेवण झाल्यावर पिकाला पाणी देऊन येतो असे म्हणून ते बाहेर पडले होते. 15 ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या भावाने त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन स्विच ऑफ केला होता. त्यानंतर त्यांचा शोध घेत असताना शेतातील एका झाडाला ठिबक सिंचनच्या पाईपने त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love