पुन्हा आरएसएसच्या नावाने शरद पवारांची बदनामी , अखेर गुन्हा दाखल

एका मराठी न्यूज चैनलवर लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान असलेल्या चॅटमध्ये आरएसएसच्या नावाने खोटे बनावट खाते तयार करून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून त्यांची बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर पुण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरएसएसचे पुणे महानगर कार्यवाहक संभाजी करपे ( वय 50 राहणार चंदन नगर ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून त्यामध्ये एका मराठी न्यूज चॅनेलचे लाईव्ह प्रसारण सुरू असताना बातम्यांच्या खाली लाईव्ह चॅट सदरात ‘ आरएसएस संघराज ‘ या बनावट खाते धारकाने आरएसएसचे खोटे खाते तयार करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या संबोधनाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. आरएसएसबाबत जनमाणसात गैरसमज पसरून दोन वर्गांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक माळी या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.