महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चेंबूर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या मालती दराडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. दराडे यांचे पती मुंबई पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून परिसरात राहत असलेल्या भरत संकपाळ यांच्या कुटुंबीयांशी त्यांचे चांगले संबंध होते. जानेवारीमध्ये त्यांचा मुलगा हर्षद यांच्यासोबत त्यांची मुलगी युक्ता हिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यावर दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाले त्यावेळी हर्षद याच्या आईने घरी येऊन युक्ता हिला शिवीगाळ केली होती. सदर प्रकरणी पोलिस ठाण्यात युक्ता हिने तक्रारही दिली होती त्यानंतर दोन्ही कुटुंबात बोलणे बंद झाले.
एप्रिल महिन्यात युक्ता हिने हर्षद सोबत 28 मार्च रोजी विवाह केला मात्र घरातून विरोध होत असल्याने त्यांनी चेंबूर कॅम्प परिसरात एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे आपला संसार थाटला. 25 जुलै रोजी युक्ताचा भाऊ दर्शन हा तिच्या घरी थांबलेला होता त्यावेळी आपला पती हर्षद हा आपल्याला मारहाण करतो आहे असे देखील तिने सांगितले. हर्षद याने केलेल्या मारहाणीमुळे अंगावर उमटलेल्या खुणा तिने व्हाट्सएप्पवर आईला पाठवलेल्या होत्या.
मुलीची काळजी लागून राहिली म्हणून तिला डबा घेऊन आई पोहोचलेली असताना युक्ता ही दरवाजा उघडत नव्हती त्यावेळी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता युक्ता हिने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनास्थळी सुसाईड नोटमध्ये ‘ चेक माय फोन चेक माय नोट ‘ असे लिहिलेले होते. युक्ता हिच्या फोनमध्ये सासू सासरे घटस्फोट देण्यासाठी पतीवर मानसिक दबाव आणत आहेत त्यामुळे पती देखील रोज मारहाण करतो असे लिहिलेले होते. सदर प्रकारानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे.