देश हादरला..भंडाऱ्यात जेवण करून मुलाला सोबत घेतले अन..

Spread the love

देशात एक खळबळजनक घटना राजस्थान जालोर येथे उघडकीला आलेले असून आर्थिक तंगीमुळे एका पित्याने अकरा महिन्याच्या मुलाला पाण्यात बुडून ठार मारण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सांचोर येथील हे प्रकरण असून मुकेश असे पित्याचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

आरोपी त्याने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता मात्र तो कामधंदा करत नसल्याने घर चालवणे कठीण झाले त्यातून त्याने पोटच्या गोळ्याला संपवण्याचा कट रचलेला होता. मुलाला आजी-आजोबांकडे सोडल्याचा बहाणा करत तो पत्नी आणि मुलाला घेऊन गुजरातवरून राजस्थान येथे आला होता. सांचोर येथे भाविकांसाठी असलेल्या भंडाऱ्यात त्याने जेवण केले आणि पत्नीला खोटे सांगून मुलाला घेऊन गेला.

आर्थिक तंगीमुळे परेशान असताना मुलाचा अतिरिक्त खर्च आपल्यावर नको म्हणून त्याने काही अंतरावर गेल्यावर मुलाला कालव्यात फेकले त्यात मुलाचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षक म्हणून तो काम करत होता मात्र त्याची नोकरी गेली म्हणून त्याने काही दिवस भीक देखील मागितली असेही त्याने सांगितले आहे. सुरक्षारक्षक असताना धडधाकट म्हणून तो काम करत होता मात्र खराब परिस्थिती आल्यावर त्याने काम न करता चक्क भीक मागण्यास सुरुवात का केली ? हे देखील समोर आलेले नाही.


Spread the love