एक अत्यंत वेगळीच घटना महाराष्ट्रात समोर आली असून मराठी मुलींचे संरक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे असे म्हणत एका स्वयंघोषित भाईने ऑफिसमधील एका महिलेशी चॅट करत असलेले कारण देत एका तरुणाला सोबत घेतले आणि त्यानंतर कोपरगावला नेऊन त्याच्याकडून पैसे काढून घेतले तसेच वीस लाख रुपयांची देखील खंडणी त्याला मागण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाने कसेबसे बाथरूमचा बहाणा करून तिथून सुटका करून घेतली आणि पोलिसात धाव घेतली.
सदर प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून लहू विष्णू जाधव ( वय 29 राहणार नगर ), महेश भाऊसाहेब कोटमे ( वय 27 ), मंगेश माणिक भाबड ( वय 37 राहणार नाशिक ) अशी आरोपींची नावे आहेत. पुण्यातील वाकड येथील एका 33 वर्षांच्या तरुणाने याप्रकरणी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, ही घटना 17 ऑगस्ट रोजी घडलेली असून अपहरण करण्यात आलेल्या तरुण हा एका खाजगी कार्यालयात काम करतो. तिथे काम करणार्या एका महिलेसोबत त्याचे चॅटिंग होत होते त्यावेळी लहू जाधव याने महिलेसोबत चॅटिंग करू नको असे सांगण्यासाठी खराडी येथे त्याला भेटायला बोलावले होते. तिथे गेल्यानंतर तू तिच्याबरोबर केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट आमच्याकडे आहे. मराठी मुलींचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असे म्हणून फिर्यादीला हॉटेलला नेले तिथे नेल्यानंतर फोन पेच्या माध्यमातून 17 हजार रुपये त्याच्याकडून घेण्यात आले आणि त्याचे क्रेडिट कार्ड घेऊन मॉलमध्ये खरेदी देखील केली.
इतके सगळे झाल्यानंतर आता हे आपल्याला सोडून देतील अशी या तरुणांची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यांनी या तरुणाला कोपरगाव येथे आणले आणि डांबून ठेवले. बाथरूमला जाण्याचा बहाणा करत या तरूणाने स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसात धाव घेतली. फिर्यादी असलेल्या तरुणाच्या गाडीला जीपीएस लावलेला असल्याने तो तात्काळ तिथून शिर्डी पोलिस आत आला आणि तक्रार दिली त्यावेळी त्याची गाडी ही आरोपींच्या ताब्यात होती त्याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या असून तपास सुरु आहे.