‘ त्या ‘ पोलीस कर्मचाऱ्यावर संगनमताचा गुन्हा नोंदवण्याची मागणी , धर्मांतर प्रकरण

Spread the love

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण धर्मांतर आणि अत्याचार प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील दोन व्यक्तींचे निलंबन करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणात अत्याचार आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला मदत केल्याच्या आरोपाखाली निलंबीत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते प्रकाश चित्ते आणि सुनील मुथा यांनी केलेली आहे तर शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आणि आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिलेला आहे.

सदर प्रकरणात फिर्यादीवर दबाव आणण्याचा ठपका ठेवून पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचा कर्मचारी पंकज गोसावी याला जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी निलंबित केले होते. पंकज गोसावी हा फिर्यादी कुटुंबियांवर आरोपीच्या वतीने दबाव आणण्याचे काम करत होता अशी तक्रार पिडीत कुटुंबाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली होती त्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची सुरुवातीला पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास देखील टाळाटाळ केली जात होती मात्र धार्मिक संघटना यांनी इशारा देताच गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज गोसावी याच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही पुरेशी नाही तर आरोपीशी संगनमताचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा अशी भूमिका भाजप, शिवसेना, मनसे आणि आम आदमी पार्टी यांनी भूमिका मांडलेली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर यापुढे कुठलाही पोलीस कर्मचारी आरोपीला मदत करण्यास धजावणार नाही अशी देखील मागणी एका संयुक्त पत्रकार करण्यात आलेली आहे.


Spread the love