नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून तहसील कार्यालयातील रेशन कार्ड काढून देणाऱ्या एका एजंट असलेल्या व्यक्तीने खरवंडी येथील एका महिलेचा विनयभंग केलेला आहे. 18 तारखेला ही घटना घडलेली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चंद्रकांत गीताराम अकोलकर असे आरोपी व्यक्तीचे नाव असून अकोलकर याने या महिलेचे फोटो असलेले कागद रस्त्यावर टाकले होते त्यामुळे या महिलेची चांगलीच बदनामी झाली त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर महिलेची सदर महिलेची दोन वर्षांपूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी पाथर्डी येथे आली असताना चंद्रकांत अकोलकर ( राहणार निवडूंगे तालुका पाथर्डी ) याच्यासोबत ओळख झाली होती यावेळी चंद्रकांत याने मी तुमचे रेशन कार्ड काढून देतो असे म्हणून तिच्याशी ओळख वाढवली आणि त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरु झाले.
18 ऑगस्ट रोजी साडेचारच्या सुमारास महिला तिच्या शेतात उभी असताना अकोलकर यांनी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि तू माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तिचा हात पकडुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तू माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर मी तुला फाशी घ्यायला लावेल , अशी देखील त्याने धमकी दिली.
चंद्रकांत याचे असे वर्तन पाहून पीडित महिला ही घाबरुन गेली आणि तिथे तिने आरडाओरडा सुरू करताच आरोपी तिथून पळून गेला. 19 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा संध्याकाळी सहाच्या सुमारास महिला शेतातून घरी जात असताना चंद्रकांत याने मोटार सायकलवरून ‘ तू मला गुपचूप फोन कर ‘ असे म्हणत त्यांचे एकत्र काढलेले फोटो रस्त्यावर टाकून दिले आणि तिथून पलायन केले. महिलेचे हे फोटो वाऱ्याने परिसरात पसरले आणि तिची बदनामी झाली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश बाबर हे करत आहेत.