ज्यांच्यासोबत अनैतिक संबंधांचा दावा तोच भांडणात पडला अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात समोर आलेली असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू झालेल्या भांडणातून कुशा चंदर जाधव ( मूळ वय 45 मूळ राहणार रायगड सध्या राहणार पळशी तालुका मान जिल्हा सातारा ) याचा डोक्यात कुदळ घालून खून करण्यात आलेला आहे. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेली आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी बाळू गणपत जाधव ( वय पंचेचाळीस राहणार पुणे ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून कुशा जाधव आणि त्याचे कुटुंबीय कोळसा वीटभट्टीवर काम करत होते. कुशा जाधव सोबत अनैतिक संबंध आहेत असे म्हणत बाळू जाधव हा त्याच्या पत्नीसोबत वाद घालत होता. हा वाद सोडवण्यासाठी कुशा जाधव तिथे गेलेले असताना बाळू जाधव याने कुदळीने कुशा जाधव यांच्या डोक्यात वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.


Spread the love