महाराष्ट्रात एक वेगळीच घटना महाबळेश्वर येथे समोर आली असून पर्यटनासाठी आल्यानंतर दारू मागवणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. एकवीस हजार रुपयांना या ग्राहकाला फसवण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.
मुंबई येथील रहिवासी असलेले आशिषकुमार हे त्यांच्या कुटुंबीयांसह महाबळेश्वर येथे आले होते. एका हॉटेलमध्ये त्यांनी बुकींग केले आणि ऑनलाईन दारू मागण्याबाबत इंटरनेटवर माहिती घेतली. त्यावेळी महाबळेश्वर येथील एका वाईन शॉपची वेबसाईट त्यांना आढळून आली त्यावर पत्ता आणि मोबाईल नंबर असल्याने त्यांनी संपर्क करत फोनवर आपल्या दारूची ऑर्डर दिली होती. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना फोन पेचा नंबर पाठवला आणि पेमेंट करण्यास सांगितले. दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पेमेंट केले मात्र तुमची रक्कम आम्हाला आतापर्यंत आलेली नाही, पुन्हा एकदा पेमेंट करा असे सांगण्यात आले.
दोन वेळा रक्कम पाठवून देखील समोरील व्यक्ती तुमच्याकडून रक्कम आम्हाला येतच नाही असे सांगत अशिषकुमार यांच्याकडे क्रेडिट कार्ड आणि त्यांच्या बँकेच्या खात्याच्या तपशिलाची माहिती मागू लागला त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्या नंबर वर फोन केला तर तो फोन स्विच ऑफ असल्याचे समोर आले. सातत्याने संपर्क करत असूनही फोन स्विच ऑफ आल्याने तक्रारदार आशिष कुमार यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल होत आपली तक्रार नोंदवली आहे.