महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर येथे समोर आलेली असून फेसबुकवर नर्स म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकरण प्रकार उघडकीस आलेला आहे. अंबाझरी पोलिस ठाणे अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हर्षल कैलास टेंभुर्णे ( वय 26 राहणार कोहमारा जिल्हा गोंदिया ) असे आरोपीचे नाव असून तो एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतो. फिर्यादी नर्स ही देखील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात ती काम करते.
१ जानेवारी २०२२ रोजी तिची हर्षलसोबत फेसबुकवर ओळख झाली होती त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि हर्षल तिला भेटण्यासाठी तिच्या खोलीवर सतत सतत येऊ लागला आणि दरम्यानच्या काळात त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 24 जून २०२२ रोजी तिने त्याला लग्न संदर्भात विचारले त्यावेळी त्याने टाळाटाळ केली म्हणून आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर या तरुणीने पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.