फसवणुकीची एक वेगळीच घटना मुंबईतील मीरारोड येथे उघडकीला आलेली असून अमेरिकेत प्लास्टिक पिशव्या पुरवठा करण्यासाठी भाईंदर येथील एका व्यावसायिकाकडून ऍडव्हान्स रक्कम घेऊन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातच्या दोन व्यावसायिकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भाईंदर येथील रहिवासी असलेले मुकेश मेहता यांचा परदेशांत निर्यातीचा व्यवसाय आहे. अमेरिकेतून प्लास्टिक पिशव्या पुरवण्याची ऑर्डर आल्यानंतर त्यांनी गुजरात येथील म्हैसाना येथील चिराग पटेल याच्या देव एक्सपोर्ट या कंपनीशी संपर्क केलेला होता. त्यावेळी त्याने अमेरिकेत आपला भाऊ दिपेश पटेल यांचा एक एक्सेल डिस्ट्रीब्यूटरशिप नावाने प्लास्टिक पिशव्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. कोरोना काळात दिपकला तोटा झाला त्यामुळे तुम्ही पैसे गुंतवत असाल तर मी बिलावर 10 टक्के वाढवून तुमचा अधिक फायदा करून देईल असे चिराग यांनी मेहता यांना सांगितले होते त्यानंतर मेहता यांनी दोन कोटीची ऑर्डर त्याला दिली आणि त्यासाठी लागणारे पैसे मुंबई येथील एका बँकेतून कर्जावर घेतले.
सुमारे एक कोटी 83 लाख रुपयांची रक्कम मेहता यांनी दिली त्यातील एक कोटी 54 लाख रुपयांचा माल चिरागने दिला मात्र 28 लाख सहासष्ट हजारांचा माल मात्र मेहता यांना देण्यात आला नाही तर इकडे ठरल्याप्रमाणे मोबदला देखील दीपेश याने मेहता यांना दिला नाही त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी या पटेल बंधूंना फोन केले मात्र त्यांनी गुजराती भाषेत शिवीगाळ करून आणि धमक्या देऊन तुम्हाला काय करायचे ते कर असे सांगितले म्हणून हतबल झालेले मुकेश मेहता यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.