एक अत्यंत खळबळजनक अशी घटना देशात समोर आलेली असून उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात एकतर्फी प्रेमातून एका मुलीची हत्या करण्यात आलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे वय 14 वर्ष असून तो 24 वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तपासाला सुरुवात केली त्यावेळी एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत तरुणीच्या चुलतीची चौकशी सध्या सुरू असून चुलतीने मयत तरुणीवर 14 वर्षाचा अल्पवयीन मुलगा एकतर्फी प्रेम करत होता मात्र मयत मुलगी ही सतत तिच्या मित्रांशी बोलत राहायची त्यामुळे या मुलाचा राग अनावर झालेला होता त्यामुळे त्याने तिचा खून करून तिचा मृतदेह मोकळ्या खोलीत फेकून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे या तरुणीच्या घरी सारखे येणे-जाणे होते. त्या तरुणीच्या मुलाकडून पाचशे रुपये उसने देखील घेतले होते. आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आरोपीने म्हटले आहे की, मी माझे पैसे तिला मागत होतो तेव्हा ती मला टाळत होती . एकदा तिने मला चापट मारली मात्र मी तिच्यावर प्रेम करत होतो म्हणून मी तिला काही बोललो नाही.
आरोपीने पुढे म्हटले की, ‘ तू दुसऱ्या मुलांसोबत बोलतेस हे मला आवडत नाही ‘ असे तिला म्हटल्यानंतर तिने तू कोण मला सांगणारा ? अशा स्वरूपात मला तिने धुडकावून लावले होते म्हणून ती झोपेत असताना मी तिच्या डोक्यात वीट मारली आणि मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला याच दरम्यान तिचा मृत्यू झाला आणि तिला रिकाम्या खोलीत मी फेकून दिले होते त्यानंतर तिचा मोबाईल मी ताब्यात घेतला असेही त्याने सांगितले आहे.