फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..

Spread the love

चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे.

बोरिवली येथील व्यावसायिक असलेले जयंत रसानी ( वय 47 ) हे 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळी ते एका पुलाखाली गेले असताना दोन जणांनी पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील 55 ग्रॅमची सोन्याची साखळी आणि पाच ग्रॅमचे पेंडल असा एकूण 60 ग्रॅम ऐवज घेऊन पलायन केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गाडीची ओळख पटवली आणि त्यानंतर बुटावरून आरोपी फिरोज नासिर शेख त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याचा साथीदार जाफर युसुफ हा देखील यावेळी त्याच्या सोबत होता त्यालाही बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.


Spread the love