एकदा लाच घेताना धरलं केलं कि कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला असून चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत न करण्यासाठी व्यापाऱ्याकडून ३५ हजाराची लाच पोलिसाने घेतली अन याच वेळी लाचलुचपतची कारवाई होणार असल्याची शक्यता दिसताच पोलिसांने चक्क धूम ठोकली. शुक्रवारी कांदिवली पोलिस ठाण्यात ही घटना घडली असून दोन्ही लाचखोर पोलिस धरण्यात आले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , कांदिवलीमध्ये सोने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका कारागीराला अटक असताना त्याने चोरलेले सोने याच विभागातील सोने व्यापाऱ्याला विकल्याचे सांगितले. पोलीस या व्यापाऱ्याकडे पोहचले असता या सोन्याची जप्ती दाखवू नये , अशी विनंती केली व सोबतच काही लाच पोलिसांना देऊ केली. सहायक निरिक्षक अविनाश पवार आणि कान्स्टेबल रविंद्र भोसले यांनी ७५ हजार रूपयांची मागणी केली त्यावेळी व्यापाऱ्याने ४० हजार रुपये पोलिसांना दिले मात्र यानंतर उरलेल्या ३५ हजारांसाठी पोलिसांनी तगादा सुरु केला. वारंवारच्या तगाद्याला कंटाळून व्यापाऱ्याने ॲन्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली.
व्यापाऱ्याने ३५ हजार रूपये कांदिवली पोलिस ठाण्यात घेऊन येतो असे सांगताच ॲन्टी करप्शन ब्युरोने पोलिस ठाण्यात सापळा रचला आणि व्यापाऱ्याकडून रविंद्र भोसले याने ३५ हजार रुपये घेतले. दरम्यान भोसले आणि अविनाश पवार दोघांनाही सापळा लागला असल्याची कुणकुण लागली आणि लाच म्हणून घेतलेली रक्कम घेऊन भोसले दुचाकीवरून घेऊन पळाला आणि नोटा बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ॲन्टी करप्शन ब्युरोने दोघांनाही ताब्यात घेतले असून लाच आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.