देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे . रागाच्या भरात एका तरुणाने चक्क स्वतःच्या गाडीला काडी लावली आणि पेटवून दिली . त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे . फायनान्स कंपनीचे कर्मचारी हप्ते भरले नाही म्हणून त्याच्याकडे आले होते त्यावेळी त्याने संतापून हा प्रकार केला. बुधवारी सायंकाळी ग्वालियर येथील गोला मंदिर भिंड रोड येथे ही घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तरुणाने कारसाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीचे वसुली पथक पोहोचले आणि कार घेऊन जाण्यास सुरुवात केली त्यानंतर कार मालक विनय शर्मा आणि वसुली कर्मचारी यांच्यात वाद झाला आणि शर्मा याने चक्क गाडीवर पेट्रोल ओतले आणि गाडी पेटवून दिली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
कार मालक विनय शर्मा आणि वसुली पथक यांच्यात काही वादावादी झाली. कार मालक विनय शर्मा कर्ज वसुली पथकावर खूप नाराज झाला होता. वसुली पथकाने व्हिडिओ बनवणे सुरु करताच विनय शर्मा याने कारवर पेट्रोलची बाटली फेकली आणि आग लावली. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी कार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.