काही महिन्यांपूर्वी शेतात रानडुकरापासून बचाव करावा म्हणून शेताला कंपाउंड करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याने एका तरुणाचा मृत्यू झालेला होता अशाच स्वरूपाची दुसरी घटना पुन्हा बीड इथे समोर आली असून पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे ऊस पिकाचे रानडुकरापासून संरक्षण व्हावे म्हणून सोडलेल्या विद्युत प्रवाहाने शेतकऱ्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सतीश मच्छिंद्र खोले ( वय 44 राहणार पिंपळवंडी ) शेतकऱ्याचे नाव असून भानुदास एकनाथ पवार यांनी ऊसाच्या शेताला कंपाउंड केलेले आहे. रानडुकरापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी त्यामध्ये करंट सोडलेला होता त्यावेळी शुक्रवारी पहाटे पाच वाजता सतीश हे त्यांच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले त्यावेळी एकनाथ पवार यांच्या शेतात सोडलेल्या कुंपणाला स्पर्श झाल्याने त्यांना शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची देखील मागणी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेली आहे.