पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून इटालियन असलेल्या व्यावसायिक महिलेचा ईमेल एड्रेस हॅक करून तळेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीतून वेगवेगळ्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून तब्बल 54 लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे. सुशील भिमराव गडलिंग ( वय 46 राहणार निगडी ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इटालियन महिला अंनालीसा फेरी यांची तळेगाव एमआयडीसी येथे एक कंपनी असून त्यांचा ईमेल एड्रेस हॅक करून कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्तींना ईमेल केला त्यामध्ये चार कंपन्यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. अधिकृत असलेल्या ईमेल वरून हा ईमेल आल्यावर संबंधित व्यक्तींनी 54 लाख रुपये ट्रान्सफर केले .
पुन्हा याच ई-मेलवरून पैशाची मागणी करण्यात आल्याने कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्तींनी इटालियन महिला यांना फोन केला त्यावेळी आपण कोणतेही पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले नाही असे त्यांनी सांगितले त्यावेळी फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. तळेगाव एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी तक्रार देण्यात आली असून तपास सुरु असल्याचे समजते .