‘ तू बालिश मुलगी आहेस ‘ म्हणत छळलं , अखेर माहेराला आली अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना अकोला येथे समोर आलेली असून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत यावलखेड येथे हा प्रकार घडलेला असून दर्शना प्रशांत पवार ( वय 24 राहणार बालाजी नगर कात्रज पुणे ) असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येनंतर सासरची सर्व मंडळी फरार झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सदर प्रकरणी मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार दिली असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे दर्शना हिचा विवाह सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रशांत रामकृष्‍ण पवार ( गाव गायरान तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा सध्या राहणार बालाजी नगर कात्रज पुणे ) याच्या सोबत झालेला होता. तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.

माहेरच्या व्यक्तींकडून दर्शना हिला सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे साडेचार लाख हजारांच्या वस्तू भेट म्हणून देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत पुणे येथे राहायला गेली. प्रशांत याचे वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे सर्व जण एकत्र राहत होते मात्र काही दिवसातच लहान-सहान गोष्टींवरून पती आणि सासरच्या व्यक्तींनी तिला त्रास देण्यास सुरू केले.

लग्नानंतर काही दिवसातच तुझ्या आईवडिलांनी लग्नामध्ये पाहुण्यांची चांगली सोय केली नाही. आम्हाला हलक्या दर्जाच्या वस्तू दिल्या. तू बालिश मुलगी आहेस असे टोमणे देत तिला मारहाण देखील करत होते असे देखील तक्रारदार यांनी म्हटलेले आहे. दर्शना आपल्याला या गोष्टी फोनवर सांगत होती तसेच माहेराहून दीड लाख रुपये आण असेदेखील सासरची मंडळी म्हणायची असा देखील आरोप तक्रारदार यांनी केलेला आहे.

दर्शना ही वारंवार आपल्याला या प्रकाराची कल्पना देत होती मात्र आज ना उद्या दिवस निघून जातील आणि परिस्थिती सुधारेल असे तिला माहेरच्या मंडळीकडून सांगण्यात येत होते मात्र सासरच्या मंडळी रोज नवनवीन मागण्या तिला करू लागले. तुला चांगलं वागता येत नाही. प्रशांत आता दुसरे लग्न करेन अशी देखील धमकी तिला देण्यात आली त्यानंतर तिने यावलखेड येथे माहेरी येत 19 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येसाठी सासरची मंडळी जबाबदार आहेत असे माहेरच्या असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.


Spread the love