एक खळबळजनक घटना सोलापूर येथे उघडकीला आलेली असून एका अल्पवयीन मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून दुसऱ्या मित्राने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले आणि मित्राने त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी पैसे देखील उकळले. सतत होत असलेल्या या प्रकाराला वैतागून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पवन दिगंबर खंदारे ( दोन नंबर झोपडपट्टी संजय गांधी नगर सोलापुर ) आणि गणेश काकडे ( राहणार खवणी तालुका मोहोळ ) अशी आरोपींची नावे असून 2019 पासून तर 2022 पर्यंत या काळात त्यांनी सदर मुलीचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगत जबरदस्तीने तिला गाडीवर बसवले त्यानंतर शहरापासून दूर गेल्यावर गणेश काकडे याने या मुलीसोबत असभ्य वर्तन करतानाचा फोटो पवन खंदारे याने काढला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला काही काळ भीतीपोटी मुलगी गप्प राहिली मात्र आरोपींनी त्याचा फायदा घेत वारंवार तिच्यासोबत अशाच पद्धतीचे वर्तन सुरू केले. आरोपी पीडित मुलीसोबत बोलण्यासाठी तिच्या वडिलांना वेगवेगळ्या फोनवरून ते सतत त्रास देऊन परेशान करू लागले. अखेर मुलीने आपल्या नातलगांशी चर्चा केली आणि पोलिस ठाण्यात धाव घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत बोलण्यास मुलीने विरोध केला असता ‘ तुला सांगितलेले एकदा समजत नाही का..गाडीवर बस तुझ्याशी बोलायचे आहे नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर टाकतो ‘ असे देखील धमकी ते देत होते असे पीडित मुलीचे म्हणणे आहे.