बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेहच आला हाती , दोन दिवस वाट पाहिली अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून नांदेड जिल्ह्यातील पळसवाडी तांडा येथे एका विवाहित तरूणाचा मृतदेह चार दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे . प्रल्हाद बळीराम राठोड ( वय 38 ) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, प्रल्हाद राठोड हे लग्न झाल्यानंतर त्यांची सासुरवाडी असलेल्या रामेश्वर तांडा येथे राहत होते. मामाच्या मुलीसोबत त्यांनी लग्न केले असून ग्रॅनाईट फरशीचे काम ते करत असायचे. 31 तारखेला ते नेहमीप्रमाणे जेवण करून बाहेर पडलेले होते मात्र एक ते दोन दिवस ते घरीच आले नाही. नातेवाईकाकडे गेले असतील असे समजून घरच्यांनी जास्त विचार केला नाही मात्र कालावधी वाढू लागल्यानंतर मात्र घरच्यांना चिंता वाटू लागली.

त्यांची पत्नी यांनी मालापूर पोलिस ठाण्यात दोन सप्टेंबरला हरवल्याची तक्रार दाखल केली मात्र तपास सुरू असतानाच हालिंगी तांडा जवळ काही व्यक्तींना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह प्रल्‍हाद राठोड यांचा असल्याचे समोर आले. त्यांचा खून कोणी केला हा प्रश्न आता निर्माण झालेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


Spread the love