‘ तसल्या ‘ साईटवर रामदेवबाबाची जाहिरात करून चक्क सेक्सवर्धक गोळ्याचा कारभार

Spread the love

देशात एखाद्या व्यक्तीचे नाव झाले कि त्याचा गैरवापर करण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय होतात. अशाच एका घटनेत सेक्सवर्धक औषधं विकण्यासाठी अनधिकृतपणे रामदेव बाबांचा फोटो वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपली औषधे विकली जावीत म्हणून चक्क पॉर्न साइट्सवर औषधांच्या जाहिरातीवर बाबा रामदेव यांचा फोटो टाकण्यात आला होता. तक्रार दाखल झाल्यावर शुक्रवारी हरिद्वार पोलिसांनी आग्रा येथे छापा टाकून घटनास्थळावरून दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आणि सोबतच अडीच कोटी रुपयांची औषधंही जप्त केली.

उपलब्ध माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या दिव्य योग मंदिर पतंजली फेस 1 बहादुराबाद या संस्थेचे प्रतिनिधी राजू वर्मा यांनी 28 जुलै रोजी बहादुराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जाहिरातीत एका पॉर्न साइटवर रामदेव बाबांचा फोटो वापरला होता. रामदेव बाबांचा फोटो वापरून सेक्स औषधं विकली जात आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आयटी टीम सक्रिय केली आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवले.

पोलिसांनी छापा टाकला असता कॉल सेंटरच्या वरती असलेले गोदाम उघडताच हरिद्वार पोलीसही आश्चर्यचकित झाले. हे गोदाम अडीच कोटी रुपयांच्या सेक्सवर्धक औषधांनी भरले होते. औषधांच्या स्वरूपात तेल, कॅप्सूल आणि गोळ्या होत्या. पोलिसांनी 1000 कॅन जप्त केले आहेत. कर्मचारी आकाश शर्मा (रा. सेक्टर हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉलनी) आणि सतीश कुमार (रा.किशोरपुरा) यांना कॉल सेंटरमधून अटक करण्यात आली असून सध्या पोलीस आणखी सात आरोपींचा शोध घेत आहेत.


Spread the love