नातेवाईकांसोबत ‘ त्या ‘ रात्री भरपूर गप्पा मारून घरी आला अन ..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जळगाव येथे समोर आलेली असून पत्नी माहेरी गेल्यानंतर घरी एकाकी पडलेल्या पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील रामेश्वर वस्ती वसाहत येथे समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विजय यशवंत काळे ( वय 28 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून पत्नी माहेरी गेल्यानंतर विजय रात्री त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता त्यावेळी त्याने नातेवाईकांसोबत भरपूर गप्पा मारल्या आणि त्यानंतर घरी आल्यावर आत्महत्या केली.

विजय हा पत्नी आणि मुलांसह रामेश्वर कॉलनी येथे सिद्धार्थ नगर परिसरात राहात होता. मजुरी आणि हमाली करून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करायचा . मंगळवारी रात्री नातेवाईकांशी गप्पा मारून तो घरी आला आणि त्यानंतर त्याने घरातच आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. वृत्त लिहीपर्यंत त्याच्या आत्महत्येचे नक्की काय कारण होते हे समोर आलेले नाही.