अनेक नागरिकांना स्मार्ट फोन आल्यानंतर त्याचा योग्य वापर कसा करायचा हे समजत नाही आणि त्यातून ते सापळ्यात अडकत जातात. मुंबई येथे असाच एक प्रकार समोर आलेला असून घाटकोपर पश्चिम येथे एका वृद्ध व्यक्तीला ‘ सेक्सटॉर्शन ‘ माध्यमातून लुबाडण्यात आलेले आहे आणि त्यातून त्यांची सुमारे सव्वा दोन लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे 75 वर्षे असून घाटकोपर पश्चिम येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. पाच सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी नंबर वरून व्हाट्सअपवर मेसेज आलेला होता त्यामध्ये मी जयपूरची आहे असे सांगण्यात आले होते त्यानंतर काही वेळाने त्यांना याच नंबरवरून व्हिडिओ कॉल आला त्यावेळी व्हिडिओ कॉलवर एक महिला आपल्या अंगावरील कपडे काढत होती. ते पाहिल्यानंतर समोरच्या वृद्ध व्यक्तीला या तरुणीने तुम्ही देखील असाच प्रकार करा असा आग्रह केला त्यानंतर तिच्या बोलण्याला भुलून या व्यक्तीने नको तो प्रकार केला आणि दरम्यानच्या काळात समोरील तरुणीने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
घटना घडल्यानंतर काही तासांनी एका अज्ञात नंबर वरून या वृद्ध व्यक्तीला फोन आला त्यावेळी त्यांनी आपण दिल्ली पोलिस दलातील आयपीएस अधिकारी राहुल अहिरवार असे असून महिलेसोबतच्या तुमच्या व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली आहे. मला तीस हजार पाचशे रुपये देऊन टाका नाहीतर तो व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात येईल अशी त्याने धमकी दिली सोबतच आपल्या बँकेच्या खात्याचा तपशील देखील दिला. घाबरून गेलेल्या व्यक्तींने ही रक्कम जमा केली मात्र घाबरून गेलेल्या या व्यक्तीला पुन्हा एकदा आपण पत्रकार आहोत असे सांगत बँकेच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली.
आधीचे पैसे गेलेले आहेत आता पुन्हा 50 हजार रुपये द्यावे लागतील मात्र आपला व्हिडिओ कुठे शेअर होणार नाही असे तक्रारदार यांना वाटले आणि त्यांनी पुन्हा 50 हजार रुपये त्या खात्यात जमा केले. अशाच पद्धतीने पैसे जमा करण्यास आरोपी सोकावले आणि त्यांनी तक्रारदार यांच्याकडून सुमारे सव्वा दोन लाखांची रक्कम लुटली . त्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला असून तपासाला सुरुवात केली आहे.