महाराष्ट्र हादरला..पत्नीचा खून करून डॉक्टर चारचाकी वाहनातून घेऊन जात होता मात्र..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून अकोला येथे डॉक्टर असलेल्या एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केलेली आहे. अकोला शहरातील समर्थ नगर परिसरात ही घटना घडली असून आरोपी डॉक्टरला पातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तिचा खून केल्यानंतर आरोपी हा तिचा मृतदेह संशयास्पदरित्या चारचाकी वाहनातून घेऊन जात होता मात्र काही नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी त्याचे वाहन अडवले त्यावेळी हा प्रकार समोर आला. डॉक्टर राजेश भास्कर ठाकरे ( वय 32 ) असे आरोपीचे नाव असून त्याने त्याची पत्नी वर्षा हिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो चारचाकी गाडीतून मृतदेह घेऊन चाललेला होता मात्र काही नागरिकांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाहन अडवून त्याची चौकशी सुरू केली त्यावेळी हे सत्य समोर आले.