केवळ ‘ टाईमपास ‘ म्हणून चार महिने पोलिसांना दमवले , महिलांना म्हणायचा की..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू असून हा व्यक्ती चक्क फेसबुक अकाउंटच्या मदतीने महिलांचे फोटो चोरून त्यानंतर ते फोटो मॉर्फ करून महिलांना पाठवत ब्लॅकमेल करत होता. महिलांना त्यांचे आक्षेपार्ह फोटो रात्रीच्या सुमारास पाठवून हे फोटो व्हायरल करेल अशी धमकी द्यायचा त्यानंतर त्यांना व्हाट्सअपवर मला व्हिडीओ कॉल करा असे देखील तो सांगायचा अशा पद्धतीने त्याने सुमारे ८५ महिलांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील अलिगड येथील ही घटना असून आरोपीचे नाव गणेश असल्याचे समजते. गणेशच्या मोबाईलमध्ये 485 फोटो , 105 व्हिडिओ सापडले असून फेसबुक मेसेंजर आणि व्हाट्सअपवर सुमारे 25 महिलासोबत तो संपर्कात होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती सुमारे चार महिने तो पोलिसांना हुलकावणी देत होता. फरीदाबाद येथील पोलिस तसेच राजस्थान आणि उत्तरप्रदेश पोलीस देखील त्याचा शोध घेत होते.

सहा मे रोजी एका महिलेला त्याने मेसेज पाठवला होता त्यामध्ये या महिलेचा एक फोटो मॉर्फ केलेला होता. जर माझा नंबर ब्लॉक केला तर हा फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी देखील त्याने धमकी दिली. महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला त्यावेळी पतीने संबंधित नंबरवर फोन केला तर तो फोन स्विच ऑफ आला.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अशाच पद्धतीने आपण सुमारे 85 महिलांना ब्लॅकमेल केलेले आहे याची कबुली दिली असून त्याच्या गुन्ह्याची पद्धत पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. फेसबुकवर महिलांचे फोटो तो आधी घ्यायचा त्यानंतर त्या फोटोला मॉर्फ करून त्या महिलेचा नंबर आल्यानंतर तिला तो फोटो पाठवत तिला कॉल कर असा मेसेज देखील करायचा असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदर प्रकार हा पैशासाठी नव्हे तर केवळ टाईमपास म्हणून आपण करत होतो असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. तब्बल चार महिन्यांनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


Spread the love