..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Spread the love

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेला आहे. अशोक चव्हाण यांच्या या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलेले आहे.

शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांनी देखील चव्हाण यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिलेला असून विनायक राऊत यांनी अशोक चव्हाण जे बोलले ते खरे आहे. भाजपसोबत सरकार असताना आपल्यासोबत सतत अन्याय होत आहे असे एकनाथ शिंदे म्हणत होते आणि त्यांनी यासंदर्भात प्रथम आवाज उठवला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली होती मात्र आता शिंदे हे भाजपच्या जवळ कसे गेले हे फक्त तेच सांगू शकतात असेही ते म्हणाले आहे.


Spread the love