महिला पोलीस अंमलदाराला जाळ्यात ओढले , गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

Spread the love

पोलीस म्हटल्यानंतर आपल्या कामगिरीचे आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करणारा व्यक्ती अशी प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांची देखील फसवणूक करणारे महाभाग असतात असे एक प्रकरण बीड येथे एक अशीच घटना समोर आलेली असून प्रेमाचे नाटक करून एका महिला पोलीस अंमलदाराला जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करत तब्बल 13 लाख रुपये तिच्याकडून उकळण्यात आले .4 ऑक्टोबर रोजी सदर प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पिडीत अंमलदार 2020 पासून शिवाजीनगर ठाणे हद्दीत असलेल्या एका ठिकाणी भाड्याच्या घरात आई आणि भावासोबत राहत होत्या. त्यावेळी त्यांची ओळख गल्लीतील रहिवासी असलेला विनायक अनिल सवाई याच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि विनायक याने आपल्याला पैशाची गरज आहे असे सांगून पैसे घेतले . विशेष म्हणजे पीडित महिला अंमलदाराने हे पैसे त्याला संस्थेतून व्याजाने काढून दिले.

पीडित महिला अंमलदाराने त्याच्याकडे पैशाचा तगादा सुरू केला त्यावेळी त्याने तिच्यासोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. सदर घटनेनंतर वेळोवेळी अशाच पद्धतीने त्याने महिला अंमलदाराकडून तब्बल 13 लाख रुपये उकळले असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पीडित महिलेने अखेर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


Spread the love