महाराष्ट्रात खळबळजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे उघडकीला आलेली असून एका विवाहित महिलेला बदनामीची धमकी देत कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील एका उच्च शिक्षण तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याला सध्या आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून सतत मोबाईलचे सिम कार्ड बदलून तो पोलिसांना चकवा देत होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, योगेश उत्तम गिरी ( राहणार साईनगर देगलूर जिल्हा नांदेड ) असे आरोपीचे नाव असून शिरोळ तालुक्यातील महिलेला तो आपण मैत्रीण आहोत असे सांगून तिच्यासोबत त्याने संपर्क वाढवला होता. मुलीच्या नावाने मेसेज केल्यानंतर या महिलेला आपलीच कोणीतरी मैत्रीण आहे असे समजून ती त्याच्यासोबत बोलू लागली होती मात्र समोरील व्यक्ती हा अपरिचित असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्यासोबत संपर्क तोडला होता. वेगवेगळ्या मोबाईल मधून तो वरून तो तिला मेसेज करत होता त्यानंतर ही महिला चाकण येथे गेल्यानंतर संशयित व्यक्तीने तिला गाठले आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
सुमारे आठ महिने तो अशाच पद्धतीने धमकी देऊन तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता. पीडित महिलेने अखेर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर तो फरार झाला. गेल्या वीस दिवसांपासून तो वेगवेगळ्या सिमकार्ड वरून तिला मेसेज करत होता आणि पोलिसांची देखील दिशाभूल करत होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सुमारे 9 सिम कार्ड आढळून आलेले आहेत .