शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून घरासमोर लघुशंका करत असणाऱ्या व्यक्तीला रोखले म्हणून महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीला आलेला आहे.
उमाकांत किसनराव पवार ( वय 66 ) , चेतन उमाकांत पवार ( वय 40 ) , तुषार उमाकांत पवार ( वय 30 ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांच्या घरासमोर उमाकांत यांचा कामगार लघुशंका करण्यासाठी आलेला होता म्हणून फिर्यादी यांनी त्याला हटकले त्यामुळे आरोपींना त्याचा राग आला आणि त्यांनी फिर्यादीच्या मुलाला दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून विनयभंग केला असेही त्यांनी म्हटले आहे.