पुण्यात एक खळबळजनक घटना पिंपरी परिसरात उघडकीला आली असून एका महिलेच्या घरात विनापरवानगी येऊन तिला चपलेने मारहाण करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार 30 तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडलेला आहे.
सदर प्रकरणी पीडित महिलेने तीन तारखेला पोलिसात फिर्याद दिली असून 23 वर्षीय एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीतला असून विनापरवानगी तो फिर्यादी यांच्या घरात घुसला आणि त्यानंतर त्याने वाद उत्पन्न केले आणि फिर्यादी यांना चपलेने मारले त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली होती.