सोशल मीडियावर फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीला येत असून नागरिक त्यातून देखील धडा घेत नसल्याचे चित्र समोर आहे. अशीच एक घटना पुण्यात उघडकीला आली असून अमेरिकेतून पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकलेले आहे असे सांगत एका उच्चभ्रू तरुणीकडून तरुण जवळपास दीड लाख रुपये लुटण्यात आले आहेत. 16 ऑगस्ट रोजी फसवणुकीचा हा प्रकार घडलेला असून पीडित तरुणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तरुणीने म्हटल्याप्रमाणे, फिर्यादीची आरोपीची ओळख ही जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर झाली होती. यश अग्रवाल असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत एक महिला देखील आरोपी आहे. आरोपीने फिर्यादीला सांगितले की त्याने तिच्यासाठी अमेरिकेतून गिफ्ट पाठवलेले आहे त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादीच्या फोनवर एका महिलेचा फोन आला त्यामध्ये तिने आपण दिल्लीतील इंदिरा गांधी एअरपोर्टच्या कस्टम डिपार्टमेंटमधून बोलत आहे असे सांगितले .
तुमच्यासाठी महागड्या वस्तू आलेल्या आहे त्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगत जीनास अहमद नावाच्या एका व्यक्तीच्या खात्याचा नंबर पाठवला त्यामध्ये फिर्यादी यांनी पैसे भरले होते. वेगवेगळ्या पद्धतीने अशाच स्वरूपात आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैसे भरून घेतले मात्र कुठलेच गिफ्ट आले नाही म्हणून फसवणूक झाल्याची जाणीव फिर्यादी यांना झाली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.